Friday, February 29, 2008

डेट्रोइट च्या इतिहासत घडलेली आश्चर्यकारक घटना


(ही सत्य घटना नाही पण आमच्या एका मित्राची गम्मत म्हणुन हे तयार केले आहें )खाली दिलेल्या वेबसुची वर या प्रकारे कात्रणे तयार करता येतात :


Thursday, February 28, 2008

लिप दिवस २९ फेब्रुवारी

From Wikipedia, the free encyclopedia
A leap year (or intercalary year) is a year containing one or more extra days (or, in case of lunisolar calendars, an extra month) in order to keep the calendar year synchronised with the astronomical or seasonal year. For example, February would have 29 days in a leap year instead of the usual 28. Seasons and astronomical events do not repeat at an exact number of full days, so a calendar which had the same number of days in each year would over time drift with respect to the event it was supposed to track. By occasionally inserting (or intercalating) an additional day or month into the year, the drift can be corrected.

जॉर्जियन दिनागणना
In the Gregorian calendar, the current standard calendar in most of the world, most years that are divisible by 4 are leap years. In a leap year, the month of February has 29 days instead of 28. Adding an extra day to the calendar every four years compensates for the fact that a solar year is almost 6 hours longer than 365 days.
However, some exceptions to this rule are required since the duration of a solar year is slightly less than 365।25 days। Years which are divisible by 100 are not leap years, unless they are also divisible by 400, in which case they are leap years.For example, 1600 and 2000 were leap years, but 1700, 1800 and 1900 were not. Going forward, 2100, 2200, 2300, 2500, 2600, 2700, 2900, and 3000 will not be leap years, but 2400 and 2800 will be. By this rule, the average number of days per year will be 365 + 1/4 − 1/100 + 1/400 = 365.2425, which is 365 days, 5 hours, 49 minutes, and 12 seconds.
The Gregorian calendar was designed to keep the vernal equinox on or close to March 21, so that the date of Easter (celebrated on the Sunday after the 14th day of the Moon that falls on or after 21 March) remains correct with respect to the vernal equinox.The vernal equinox year is about 365.242374 days long (and increasing), whereas the average year length of the Gregorian calendar is 365.2425.
The marginal difference of 0।000125 days means that in around 8,000 years, the calendar will be about one day behind where it is now. But in 8,000 years, the length of the vernal equinox year will have changed by an amount which cannot be accurately . Therefore, the current Gregorian calendar suffices for practical purposes, and Herschel's correction (making 4000 AD not a leap year) will probably not be necessary.

हिंदू दिनागणना
In the Hindu calendar, which is a lunisolar calendar, the embolismic month is called adhika maas (extra month)। It is the month in which the sun is in the same sign of the stellar zodiac on two consecutive dark moons। Adhika Maas typically occurs once every 3 years, or 4 times over 11 years. So the yearly lag of a lunar year (which tends to have ten fewer days (355-356 days) per year than solar calendar) is adjusted every 3 years. Thus, Hindu festivals tend to occur within a given span. For example: the No Moon during Diwali festival tends to occur between October 22 and November 15.

लिप दिवस २९ फेब्रुवारी दिनविशेष
A person born on February 29 may be called a "leapling". In common years they usually celebrate their birthdays on 28 February or 1 March.
For legal purposes, their legal birthdays depend on how different laws count time intervals. In Taiwan, for example, the legal birthday of a leapling is 28 February in common years, so a Taiwanese leapling born on February 29, 1980 would have legally reached 18 years old on February 28, 1998 “If a period fixed by weeks, months, and years does not commence from the beginning of a week, month, or year, it ends with the ending of the day which proceeds the day of the last week, month, or year which corresponds to that on which it began to commence। But if there is no corresponding day in the last month, the period ends with the ending of the last day of the last month” In some situations, March 1 is used as the birthday in a non-leap year since it then is the day just after February 28
1896 - Morarji Desai, Prime Minister of India (d. 1995)

अधिक माहिती : http://en.wikipedia.org/wiki/Leap_year#Birthdays

अमेरिकेचा जगाचा नकाशा


धन्यवाद पंकज पाटील.

Tuesday, February 26, 2008

लालुंची किमया : रेल्वे अर्थसंकल्प

लालुंची किमया रेल्वे अर्थसंकल्प
- भारतीय रेल्वेला गेल्या वर्षी झाला २५ हजार कोटींचा फायदा...
- रोज धावतात ११००० गाड्या...
- त्यापैकी ७००० आहेत प्रवाशांसाठी...
-छत्रपती शिवाजी टर्मिनस होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वेस्थानक
- मुंबईकरांसाठी उपनगरी गाड्यांच्या ३०० अतिरिक्त फेऱ्या
- उपनगरी तिकीट किंवा पासदर "जैसे थे'
- "गो मुंबई स्मार्ट कार्ड' योजना मार्चपासून
- रेल्वे प्रवासी भाड्यात द्वितीय वर्गासाठी ५ टक्के आणि एसी, प्रथम व अन्य वर्गांसाठी २ ते ७ टक्के भाडेकपात
- लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ५० रुपयांवरील तिकिटावर एक रुपया कपात
- लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटावर गाडी पोचण्याची वेळ - रेल्वेस्थानकांवर बॉम्बशोधक उपकरणे व क्‍लोज सर्किट टीव्ही
- रेल्वेस्थानक परिसरात व काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर प्रवाशांना सूचना मिळणार
-२०१० पर्यंत सर्व डबे स्टेलनेस स्टीलचे होणार
- देशात ६ हजार ऑटोमेटिक तिकीट मशीन बसविणार
- रेल्वे सुरक्षा बल व अन्य विभागांत महिलांना ५ ते १० टक्के आरक्षण
- काही हमालांना गॅंगमन म्हणून रेल्वेत नोकरी देणार
- शाळा-महाविद्यालयांपासून घरापर्यंत मुलींना पदवीपर्यंत, तर मुलांना बारावीपर्यंत मोफत रेल्वे प्रवास सवलत
- ज्येष्ठ महिलांना सर्व श्रेणीच्या प्रवास भाड्यात ३० ऐवजी आता ५० टक्के सवलत
- रेल्वेस्थानके व गाड्यांची स्वच्छता खासगी संस्थांमार्फत
- मोबाईलवर रेल्वेचे तिकीट २०१० पर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
- ई-तिकिटासाठी उत्तेजन देणार, प्रतीक्षा यादीवरील तिकीटही काढता येनार
- प्रवासी भाडं आणि मालवाहतूकीच्या उत्पन्नामध्ये झाली १३ टक्के वाढ...त्यामुळे रेल्वेचं जाळं वाढवण्याकडे देता येईल भर...
- येत्या दोन वर्षात स्वयंचलीत तिकीट मशिन घेणार...
- रेल्वेमध्ये सुविधा देणार मोड्यूलर टॉयलेटची...
- डिस्प्ले सिस्टीम करणार अधिक प्रभावी...
- गर्दीच्या वेळी जास्त गाड्या सोडणार...
- राजधानी, शताब्दीला मिळणार अत्याधुनिक कोच...
- तिकीटांवर आता प्रिंट होणार पोहोचण्याची वेळ...
- ३० महत्त्वाच्या स्टेशन्समध्ये होणार मल्टी लेव्हल पार्कींग...
- स्टेशन्सवर कलर डिस्प्ले, टचस्क्रीन सुविधा...
- लॉंग डिस्टन्स ट्रेनसाठी ५०० प्लॅटफॉर्म करणार अधिक मोठे...
- तिकीट सिस्टीम स्मार्ट कार्ड होण्यासाठी रेल्वे करणार प्रयत्न
- बस डेपोवर विकणार "गो मुंबई' कार्ड...
- मोठ्या स्टेशन्सवर आता सीसीटीव्ही...
- उत्तर भारतातल्या बहुतांश मार्गांचे विद्युतीकरण...
- दोन वर्षात तिकीटांसाठीच्या रांगा दिसणार नाहीत...
- संवेदनशील स्थानकांवर पुरवणार विशेष सुरक्षा...
- १६५४८ जुने रेल मार्गांचे करणार नूतनीकरण
- तिकीटांचे कन्फर्मेशन लवकरच करता येईल मोबाईलवरून...
- मुलींना पदवी शिक्षणापर्यंत मोफच सिझन तिकीट...
- जेष्ठ महिलांसाठी सवलत तीस टक्‍क्‍यावरून पन्नास टक्‍क्‍यावर...
- १० गरीब रथ, ५३ नव्या गाड्या...
- ५० किमी पुढे दुसऱ्या वर्गाचं तिकीट ५ टक्‍क्‍यानं कमी
- थर्ड एसी फेअर तीन टक्‍क्‍यानं कमी...
- सेकंड एसी फेअर तीन टक्‍क्‍यानं कमी
- फर्स्ट क्‍लास एसी फेअर सात टक्‍क्‍यानं कमी...

Saturday, February 23, 2008

Friday, February 22, 2008

कारण हे वयच असं असतं..

पकड घट्ट असते तरी वाळू निसटून जाते..
रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते....
कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात...
पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात...
सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....
कारण हे वय असंच असतं.....

कुठून येतं फुलपाखरू??
कुठे निघुन जातं ??
चिमटीत उरतो रंग
तेव्हा रंगात फूलपाखरू दिसतं....
भिरभिरणारं कोवळं वय हळूच तिथं फसतं.....
कारण हे वयच असं असतं....

सप्तरंगी स्वप्नांचे दिवस..
वाऱ्यासारखे निघून जातात..
जगाने दिलेल्या जखमांवर..
हळूवार फुंकर घालतात..
जगाच्या भुलवण्याला हे कसं फसतं..?
कारण हे वयच असं असतं..
(अशीच कुठेतरी वाचालेली कविता )

Wednesday, February 20, 2008

आपण भेटत राहु.......

आपण भेटत राहु.......
चला दोस्तहो इतके दिवस इथे यायला मिळायला....कविताही पोस्ट करायला मिळाल्यातपण आता तेव्हढ्या रेग्युलरली यायला मिळेल अस वाटत नाही त्यामुळेच...आताशा जे वाटल ते लिहील , तशी ही अर्धीच आहे....पुर्ण नाही लिहु शकलो म्हणुन क्षमा असावी

आपण भेटत राहु
अधुन् मधुन का होइना
इथुन तिथुन् का होइना
पण आत्ता जायलाच हव
वेस ओलांडुन
दुरवरच क्षितीज बोलावतय
खुणावतय...इथले पाश आता विरळ
होतायेत...
घोंघावाणारे वादळवाट बघतय माझी
जरूरी नाही माझ् इथे परतण
पण म्हणुन काही होणार टळत नाही
घडणार घडतचजुन जात नव येत
माझ गाण मलाच
एकू येनार
न मलाच शेवटी गाव लागणार
पण म्हणुनच मी जाणार
मुकपणे....
गोठणार माझ अस्तित्त्व
अजुनच काळोखात बुडवणार...
शेवटचच कदाचित तुम्हाला मी इथे दिसणार....
त्या क्षितीजाला आता माझा प्रवास होणार

(अशीच कुठेतरी वाचालेली कविता )

Tuesday, February 19, 2008

हवेवर चालणारी गाड़ी चे ध्वनिचित्रमुद्रण

हवेवर चालणारी गाड़ी सत्यात आणली आहे. तिचे ध्वनिचित्रमुद्रण खाली पहा. धन्यवाद निलेश हा ईमेल लिंक पाठावल्या बद्दल.

Monday, February 18, 2008

"टाटां'ची आता हवेवर चालणारी कार!

"टाटां'ची आता हवेवर चालणारी कार!
एक लाख रुपयांमध्ये "नॅनो' कार आणून सामान्य नागरिकांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करणारे रतन टाटा आता आणखी एका आश्‍चर्यकारक मोहिमेवर काम करीत आहेत. सर्व काही योजनेनुसार झाले तर त्यांची "टाटा मोटर्स कंपनी' एका वर्षाच्या आत हवेवर चालणारी कार तयार करेल. हवेवर चालणारी कार पाच जणांना बसता येईल, अशा बनावटीची राहणार असल्याचे टाटांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करीत असलेले फ्रान्सचे अभियंता गाय नेग्रे यांनी सांगितले. या कारची बॉडी फायबर आणि काचांपासून तयार करण्यात येईल. कारच्या कॉर्बन फायबरपासून तयार करण्यात आलेल्या इंधनपुरवठा टाक्‍यांमध्ये केवळ तीन मिनिटांमध्ये हवा भरता येईल. ही हवाच कारचे इंधन असेल. या टाक्‍या चेसिसच्या आतमध्ये बसविण्यात येतील. या कारने लांब प्रवास करण्यासही कोणतीच अडचण येणार नाही. या कारचा पहिला ग्राहक पर्यावरणावर प्रेम करणारा असेल.

तांत्रिक माहिती
Moteur Developpement International (French: International Motor Development) is a Luxembourgian company that is famous for designing Compressed Air Engine vehicle prototypes marketed under the title "the Air car".
In 2002, a team of Swedish journalists from magazine Teknikens värld went to Nice to meet
Guy Nègre and try out the air car. They test-drove the car and took pictures of it.
"We tested the car and it ran quite well" ( Michael Baltierra, ABC News reporter)
Models
MDI proposes a range of vehicles developed on an identical concept:
MiniCATs is a small vehicle with three-abreast seating. Under 'urban' driving conditions, the MiniCAT has a range of 100 miles and a maximum speed of 70
MPH. The top speed is 110 km/h, with a range of 108 km. The time of recharging is 4 h. on the sector. The weight of the vehicle is 550 kg for a charge of 270 kg. It is used for local commuting. The MiniCAT's prototype was featured in the latest edition of the 'Salon Mondial de l'Automobile Paris 2002
CityCATs. Several CityCATs variants are envisaged: a
taxi with (5 seats), a pick-up with (2 seats) and a van with (2 seats). With a power limited to 25 hp (in mono-energy ie. with compressed air the sole source of energy), these vehicles have a stated range of 100 to 150 miles (approx. 240km) in urban use and a maximum speed of 110 km/h. The vehicle weight is approximately 900 kg.
MultiCATs is a modular project of vehicle for transport of passengers or carriage of goods. The autonomous vehicles can constitute a train of 4 modules. .
OneCATs is an economical car (3,500 euros) less than 500 kg to be sold in India
(Tata Motors) and Europe . Mono-energy and bi-energy (hybrid air-gasoline vehicle).
Filling
Filling the tanks with compressed air takes 3-4 minutes; therefore, the cars will also be able to be used for longer journeys. In addition to the compressed air refuelling option, the car has a built-in air compressor that can plug into any standard outlet and refill the tanks in 4 hours.
Factories
There are now 50 fabrication and distribution licenses signed in the world. Some of the countries that have signed agreements include France, Germany, Spain, Portugal, Italy, New Zealand, Israel, South Africa, etc.
Zero Pollution Motors is going to make MDI vehicles in the United States
. Zero Pollution Motors and MDI are among the teams to commit to participate in the Automotive X Prize competition.
The last one is MDI Andina S.A is going to sell the car in Colombia, Peru, Ecuador and Panama.
Production in France was claimed to be starting in late 2000, and at frequent intervals, in several countries, thereafter. None are in production as of January 2008.
Staff
Guy Nègre is the CEO and Miguel Celades the
sales manager.
History
The Air Car has been in development for twenty years. In the original Nègre air engine, one piston compresses air from the atmosphere, holding it in a small container that feeds the high pressure air tanks with a small amount of air. Then that portion of the air is sent to the second piston where it works. During compression for heating it up, there is a loss of energy due to the fact that it cannot receive energy from the atmosphere as the atmosphere is less warm than it. Also, it has to expand as it has the crank. Nègre's engine works with constant torque, and the only way to change the torque to the wheels is to use a pulley transmission of constant variation, losing some efficiency. Armando Regusci's version of the air engine has several advantages over the original Nègre design. In Regusci's version, the transmission system is direct to the wheel, and has variable torque from zero to the maximum, enhancing efficiency. When vehicle is stopped, Guy Nègre's engine has to be on and working, losing energy, while the Regusci's version need not. In 2001-2004 MDI switched to a design similar to that described in Regusci's patents, which date back to 1990
.
The
Eolo Car is a version of the Air Car that was to be manufactured in Italy in 2003, but failed to get into production.
MDI has subscribed an agreement with Tata Motors, to produce air cars in India.

Saturday, February 16, 2008

• मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन.....
टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून.

दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून.....
विचारणारे तिला आता योग्य संधी बघून.

शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून.....
कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?

नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून.....
काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?

तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून.....
पहायचय रे मला एकदा प्रेम करून !

-चैत.

मनाचे श्लोक

मनाचे श्लोक
















Friday, February 15, 2008

वाहने चालवा पण जपून

वाहन चलाव्ताना दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या दुर्घटनांच्या ध्वनिचित्रफिती

जितेंद्र अष्टेकर - सकाळ वृत्तसेवा पुणे, ता. १४ - वर्षातील ३६५ दिवसांमध्ये ३०९ अपघात, त्यापैकी ११७ प्राणांतिक अपघात आणि ९२ अपघातांमध्ये जनावरांचे बळी...गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यात झालेल्या विजेच्या अपघातांची ही "धक्का'दायक आकडेवारी आहे. मात्र, या अपघातांना जबाबदार कोण, किती प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली, याचा थांगपत्ता लागलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये या अपघातांचा तपास करून फक्त अहवाल तयार करण्याखेरीज काहीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वाहन चालवताना दुर्लक्ष करू नका


सीट बेल्ट का वापरावा...


त्यामुळे वीज अपघातांमध्ये निष्पापांच्या बळींचे सत्र सुरू असून, "दोष कुणाचा,' हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. काही दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावर, विजेच्या तारांना चिकटल्याने एका युवकास प्राण गमवावे लागले. त्यापूर्वी कर्वेनगरमध्ये असाच जीवघेणा अपघात झाला होता. अशा अपघातांची पोलिस दप्तरी नोंद होते; तसेच ग्राहक किंवा वीज कंपनीकडून विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयास माहिती कळविली जाते. न्यायिक अधिकार असलेल्या विद्युत निरीक्षकांकडून चौकशी करून अहवालही तयार करण्यात येतो. येथवर सर्व सोपस्कार नियमाप्रमाणे पार पडतात. पण या अहवालांचे पुढे काय होते, किती प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होतात आणि किती प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा होते, हा मुद्दा गुलदस्तातच आहे. याउलट एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या चौकशीनंतर संबंधितांवर विद्युत निरीक्षकाने गुन्हा दाखल करायचा, असे नियमांमध्ये स्पष्ट असूनही त्याच्या अंमलबजावणीत संदिग्धता ठेवून गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे तपासणीचे बहुतेक अहवाल फायलींमध्येच धूळ खात पडून राहतात. प्रामुख्याने दुय्यम दर्जाच्या किंवा बनावट उत्पादनांचा वापर, विद्युत संचाची रचना, मांडणीकडे दुर्लक्ष आणि देखभाल-दुरुस्तीचा अभाव ही वीज अपघातांची कारणे असल्याचे बहुसंख्य प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. त्यासाठी नव्या इमारतींमधील वीजपुरवठ्याच्या साधनांची तपासणी करून परवानगी देणे, त्याबरोबरच ट्रान्सफॉर्मर, जनित्रे, वीज वाहिन्यांचीही सुरक्षेची तपासणी करण्याचे काम विद्युत निरीक्षक कार्यालयाकडेच आहे. ही परवानगी मिळाल्यावरच त्या इमारतींचा वीजपुरवठा सुरू करण्यात येतो. तरीही त्यामध्ये अनेकदा दुय्यम दर्जाच्या उत्पादनांचा वापर होत असून, ते अशा अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे आढळले आहे. मात्र, त्याबाबतही दोषींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे "रोगाचे फक्त निदान होते, उपचार मात्र दूरच राहतात.' यातून वारंवार अपघात होण्याचे प्रकार घडल्याने या अपघातांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Thursday, February 14, 2008

स्तोत्र सुमनांजली

रामरक्षा हनुमान स्तोत्र (भिमरुपी)

अथार्वशिर्ष गणपती स्तोत्र







Monday, February 11, 2008

काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे
आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो, मझ्या मनात एक मुलगी भरली आहे

आधी सिगारेट ''दैनिक सकाळ'' होती
आणि अंघोळ ''विकली ईलस्ट्रेटेड'' होतीदाढी
दाढ़ी पण फक्त आमवस्येलाच गायब होत होती
लाइफ कशी एकदम कूल मध्ये चालली होती

सिगारेट माझी आता सुटली आहे
अंघोळ रोज दोनदा घडू लागली आहे
पामोलीव शेवचा मुहुर्त अमावस्येएवजी सूर्यास्त झाला आहे
लाइफ मध्ये कसा एकदम एंथू आला आहें

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

दिसली पोरगी, मार शिट्टि भेटला चम्या,
उडव खिल्ली वेळ मिळाला तर कर भंकसगिरी
एकूण काय तर, आदर्श अशी जीवन पद्धती होती

पोरगी दिसल्यावर आता शिट्टी वाजत नाही
चम्या लोकांची खिल्ली, हल्ली आपण उडवत नाही
भंकसगिरी तर पुर्ण विसरलो एकूण काय तर,
आपण आता जेंटलमन झालो आहें

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

पिक्चर पहायचा? ''नील'' कमल पाहू
भुक लागली आहे? वडा पाव मारु
शर्ट कोणता घालायचा? लाल भडक एकदम फंडू
हेयर स्टाईल कशी करायची? छोड यार टक्कलच करु
आता मात्र रोज ''RHTDM'' ची पारायणे

Saturday, February 9, 2008

भन्नाट जाहिरात


भन्नाट जाहिरात .... प्रदीप फक्त तुझ्या साठी

Friday, February 8, 2008

सिग्नल

सिग्नल
गेली काही वर्ष ऑफिसला जायचा माझा रस्ता ठरलेला आहे - बालगंधर्वच्या पुलावरून डावीकडे वळून झाशीच्या राणीच्या चौकातून जंगली महाराज रोडला लागायचे आणि मॉडर्न महाविद्यालयाकडे मार्गस्थ व्हायचे। पुलावरून डावीकडे वळताना सिग्नल आहे. डावीकडे वळायला सिग्नल लागत नाही अशी आपल्याकडे प्राचीन समजूत आहे. काही वेळा ती बरोबर असते. परंतु या चौकातला सिग्नल थोडा वेगळा आहे. कॉर्पोरेशनकडून येणारी वाहने या सिग्नलवरून पुढे जातात आणि सरळ घोले रोडवर जातात अथवा जंगली महाराज रस्त्यावर डावीकडे वा उजवीकडे वळतात. जेव्हा त्यांना हिरवा सिग्नल असतो, तेव्हा पुलावरून डावीकडे येणा-या वाहनांनासुद्धा तांबडा सिग्नल असतो. जर तसे केले नाही तर पुलावरून येणा-या आणि कॉर्पोरेशनकडून येणा-या वाहनांची कोंडी होईल. परंतु एखादा नियम का बनविण्यात आला आहे याचा विचार न करता झुंडशाही करण्याची आपली सवय असल्याने या सिग्नल कडे काणाडोळा करण्यात येतो. मला जंगली महाराज रस्त्यावर उजवीकडे जायचे असल्याने मी सिग्नल तोडल्यास कॉर्पोरेशनकडून येणा-या वाहनांची फळी फोडून पलीकडे जावयास लागेल, ज्यामुळे मला आणि इतर वाहनांना त्रास होईल. अर्थात त्रास काय असतो याच्या लोकांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. काही लोकांना मोठाच गोंधळ माजला की ’मजा’ वाटते. गणपती उत्सवात मोठमोठ्याने भेसूर ओरडत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून साखळी करून गर्दीतून हुल्लड करत जाणा-या काही लोकांना इतर लोक घाबरले वा पळापळ/ चेंगराचेंगरी झाली की मजा वाटते! असो.या चौकात मी सिग्नल लाल असेल तर हटकून थांबतो. ज्यांना सिग्नलला थांबून उगाच वेळ ’वाया’ घालवायचा नसतो अशा काही अति-कर्म-तत्पर लोकांना मी वाटेत थांबल्याने त्रास होतो. दुचाकी वर असेन तर थोडा आणि कार मध्ये असेन तर थोडा अधिक. लोकांच्या प्रतिक्रिया ठराविक असतात - ’हे कोन येडं रस्त्यात थांबलंय’ अशा नजरेने पाहणे, हॉर्न वरचा हात न काढणे, शिव्या देणे, इ. लोक मी सोडून उरलेल्या जागेतून गाडी घुसवून पुढे जातात. मी स्थितप्रज्ञ भावाची आराधना करत ढिम्म उभा असतो.आज मात्र थोडी मजा झाली. मी सिग्नलला थांबता थांबता माझ्या बाजूला एक मुलगी कारमधून येऊन थांबली. ती तर चक्क वाहन थांबण्याचा इशारा वगैरे देऊन थांबली. दोन कार शेजारी थांबल्यामुळे तो रस्ता पूर्ण बंद झाला आणि मागच्या लोकांना हॉर्न आणि तळतळाट यांखेरीज इतर उपाय उरला नाही! न राहवून मी त्या मुलीकडे कटाक्ष टाकला ! तसं ’फ्रेंडली वेव्ह’ करायला हरकत नव्हती पण तसे केल्यास आम्ही ’पामर’ कसले :) पण बहुसंख्य लोक नियम तोडत असताना आपण नियम पाळणारे एकटेच वेडे नाही ही भावना मनाला सुखवून गेली.

http://paamar।blogspot.com/ या ब्लोग मधून

Thursday, February 7, 2008

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवातनवी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवातनवी
मुंबई , ता. ६ - नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमातळाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सिडकोने अमेरिकेतील लुईस बर्जर या कंपनीकडे सोपविली आहे. .....आराखडा तयार करण्यासाठी कंपनीला १० महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर लगेचच विमानतळ विकसकांची निवड केली जाईल, अशी माहिती सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक सी. एस. गिल यांनी दिली. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच या आंतरराष्ट्रीय विमातळाच्या कामाला सुरुवात होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या एकूण जमिनींपैकी ६५ टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. बाकीच्या २५ टक्के जमिनीसाठी या परिसरातील भूधारकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. शिवाय, जमिनी संपादन केल्यानंतर या भूधारकांना दिले जाणारे पुनर्वसन पॅकेज हे देशातील सर्वोत्तम पॅकेज असल्याचा दावाही गिल यांनी केला आहे. २०१२ पर्यंत विमानतळाच्या पहिल्या फेजचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. या विमानतळाच्या परिसरात पुरसदृश परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून येथील गाढी आणि तळोजा या नद्यांमधील गाळ काढून त्यांच्या प्रवाहाची दिशाही बदलणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन


नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. .......
कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता. त्यांना मोह पडायचा तो पुस्तकांचा, दर्जेदार साहित्याचा. नवी सुचलेली कविता त्यांना खूष करून टाकायची. त्यांच्या हातात १० रुपये ठेव, नाही तर १० लाख ठेव, त्यांना मोह पडायचा नाही. त्यांनी कधी मला जवळ बसवून संस्कारांचे धडे दिले नाहीत; पण त्यांच्या सभ्य, सुसंस्कृत वर्तणुकीतून, प्रगल्भ विचारांतून मला सारं काही समजलं होतं, की आयुष्यात काय करायचं आणि कोणत्या मार्गाला जायचं नाही. त्यांचीच शिकवण होती, की यशानं माजायचं नाही आणि अपयशानं खचून जायचं नाही. बाबांना जाऊन आज सात वर्षं होऊन गेली. ते नसले तरी त्यांची शिकवण, त्यांच्या स्मृती मला आयुष्यात सदैव साथ देतील. आई या नात्यात जगातली करुणा, माया, ममता दडली आहे. मला काही झालं तर तिचा अस्वस्थपणा पराकोटीचा वाढतो. एक आठवण सांगतो. सुरवातीच्या क्रिकेटच्या काळात शिवाजी पार्कवर सरावाला जवळ पडावं म्हणून चार वर्षं मी माझ्या काका-काकूंकडं राहायचो. त्या वेळी माझी आई एलआयसीत नोकरी करायची. तिचं ऑफिस सांताक्रूझला होतं. रोज म्हणजे अगदी दररोज ती ऑफिस संपल्यावर संध्याकाळी मला भेटायला सांताक्रूझहून त्या मुंबईच्या गर्दीत उलटा प्रवास करून शिवाजी पार्कला यायची. सुनंदन, त्या वेळी लहान असल्यानं मला तो हक्क वाटायचा. आज मी मोठा झालो. माझ्या मुलांची थोडीफार काळजी घेत असताना मला कळतं, की त्या काळी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून माझ्या आईचं ते रोज शिव ाजी पार्कला येणं काय दिव्य होतं. किती त्याग त्यांनी माझ्याकरिता केला! आजही माझ्या आईकरिता मी लहान सचिन आहे. कोणत्याही ग्लॅमरचा तिच्यावर काडीमात्र फरक पडलेला नाही. माझ्या वडिलांचे धाकटे भाऊ आहेत- ज्यांच्या घरी शिवाजी पार्कला मी चार वर्षं राहत होतो. सुरेशकाका, मंगलाकाकू माझे जणू दुसरे आई-वडील आहेत. मीसुद्धा त्यांच्याकरिता पुतण्या नसून त्यांचा मुलगा आहे. त्या चार वर्षांत मला त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. जडणघडणीच्या महत्त्वाच्या वयात मला त्यांची माया लाभली. मी क्रिकेटमध्ये नाव कमावल्यावर त्यांनी कधी गाजावाजा केला नाही. अत्यंत प्रगल्भ विचारांची साधी माणसं मला कोवळ्या वयात मिळाली, हे माझं भाग्य आहे, असं मला वाटतं. अजितदादा माझा नुसताच मोठा भाऊ नाही, तर माझा मित्र आणि मार्गदर्शक आहे. माझ्या जडणघडणीत सर्वांत मोलाचा वाटा अजितदादाचा आहे. माझ्या बॅटिंगचे सर्व बारकावे तो जाणतो. आजही माझ्या फलंदाजीविषयी मी त्याच्याशी मनमोकळी चर्चा करतो. त्याला पुढं पुढं करायला अजिबात आवडत नाही. बऱ्याच कार्यक्रमांना तो जाणूनबुजून येत नाही. मात्र माझ्या खेळावर बारकाईनं नजर असते त्याची. माझ्या क्रिकेटर बनण्यामागं त्याचा मोलाचा वाटा आहे. तीच गोष्ट माझा मोठा भाऊ नितीन आणि बहीण सविताताईची. कधीच त्यांनी माझ्या "सचिन तेंडुलकर' असण्याचा कणभर फायदा घेतला नाही. आयुष्यात त्यांनी जे काही कमावलं ते स्वबळावर. माझ्यावर प्रेम केलं ते फक्त धाकटा भाऊ म्हणून. सर्व नात्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नातं असतं ते म्हणजे गुरू-शिष्याचं. माझे गुरू रमाकांत आचरेकर आहेत. आचरेकर सरांनी मला जी क्रिकेटची शिकवण दिली ती आयुष्यभर कामाला आली. तेव्हाही आचरेकर सर सामना झाल्यावर एकच प्रश्‍न विचारायचे, ""कसा बाद झालास?'' त्यांनी किती धावा केल्या हे कधीच विचारलं नाही. मग खराब फटका मारून बाद झाल्यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत कानउघाडणी असायची. नसते लाड सरांकडं चालायचे नाहीत. त्याबरोबर चांगल्या खेळीनंतर मनमोकळी भरभरून शाबासकी मिळायची. सर सांगायचे, की फलंदाजानं कधीही तृप्त होता कामा नये. धावांची भूक सतत कायम राहायला हवी. जवळपास २३ वर्षं या गुरू-शिष्य नात्याला झाली. तुला सांगून पटणार नाही, परंतु सर किंवा अजितदादा मला आजपर्यंत वेलप्लेड म्हणाले नाहीयेत. मी आजही त्यांच्या त्या लाख मोलाच्या शाबासकीकरिता व्याकूळ आहे. सुनंदन, मला तू धडक प्रश्‍न विचारलास, की सचिन तेंडुलकरची पत्नी होणं सोप्पं आहे का? मी १०० टक्के सांगतो, की प्रचंड अवघड काम आहे. लोकांना ग्लॅमर दिसतं; पण अंजलीची भूमिका फार कठीण आहे. ती गोल्ड मेडलिस्ट डॉक्‍टर आहे. प्रत्येक माणसाला चांगलं कुटुंब हवं असतं. प्रेमळ, शांत, समाधानी, विचारी कुटुंब. मी नशीबवान आहे. मला नक्कीच तसं कुटुंब मिळालं आहे. अंजलीला कुटुंबाची काळजी घ्यायची असते आणि माझीही. ज्या वेळी आपण अटीतटीचा सामना हरतो तेव्हा माझं डोकं ताळ्यावर नसतं. मूड ऑफ झालेला असतो. त्या वेळी अंजली मुलांना माझ्याजवळ सोडते. त्या निरागस लहानग्यांमध्ये मी रमतो आणि माझी तगमग शांत होते. मागे माझ्या आयुष्यात कोपराला झालेल्या दुखापतीनं अस्थिरता आली होती. एक प्रकारची साशंकता मनात घर करत होती. अंजली स्वतः डॉक्‍टर असल्यानं तिनं मला शांत केलं. सुनंदन, लोकांना कळणार नाही, पण माझ्या मुलीनं- सारानं- माऊंट मेरी चर्चमध्ये जाऊन देवापुढं मेणाचा हात ठेवून अंजलीबरोबर जाऊन प्रार्थना केली. माझा लहान मुलगा अर्जुनही मला विचारत होता, की बाबा, तुझ्या हाताला बाऊ झाला आहे का? मी औषध लावून देऊ का? सगळे जण माझी कोपराची दुखापत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. मला वाटतं, माझ्या क्रिकेटच्या मै दानावरच्या पराक्रमाइतकंच अंजलीचं संसारातलं योगदान लाख मोलाचं आहे. माझ्यासाठी त्यांना सर्वांना माहीत आहे, की क्रिकेट माझ्याकरिता काय आहे. निःसंकोचपणे कबूल करावंसं वाटतं, की कुटुंबाच्या पातळीवर अंजलीचा अप्परहॅंड आहे तो तिच्या त्यागामुळे आणि कर्तृत्वामुळे. लग्नाला इतकी वर्षं झाल्यावर पती-पत्नी नात्याला वेगळी खोली प्राप्त होते. त्याचा अनुभव मी घेत आहे. माझं कुटुंब माझं सर्वस्व आहे. या सर्व लोकांनी अत्यंत निर्व्याज भावनेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मी क्रिकेटमध्ये यश मिळवो वा अपयश, त्यांच्या भूमिकेत काडीमात्र बदल होणार नाही. या लोकांकरिता मी नेहमी फक्त "सचिन' राहणार. माझ्या या छोट्याशा कुटुंबातल्या प्रत्येकाची सकारात्मक इच्छाशक्ती माझ्या पाठीशी भिंतीसारखी सदैव उभी असते. त्यांच्या सर्वांच्या अचाट त्यागावर माझ्या क्रिकेटच्या यशाची इमारत उभी आहे. माझ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, याच नात्यांनी तारून नेलं आहे. माझ्याकरता ही नाती ही दिखाऊ नाहीत, तर जीवनमरणाची... रक्ताची नाती आहेत. प्रत्येक माणसाला चांगलं कुटुंब हवं असतं. प्रेमळ, शांत, समाधानी, विचारी कुटुंब. मला नक्कीच तसं कुटुंब मिळालं आहे. - सचिन तेंडुलकर
-------------------- - सुनंदन लेले -------------------------








Michigan Senate approves bill to allow legal immigrant driver's licenses

Michigan Senate approves bill to allow legal immigrant driver's licenses

http://www.detnews.com/apps/pbcs.dll/article?AID=/20080206/METRO/802060468/1361

Wednesday, February 6, 2008

पुणेरी पाट्या






विनोद

कोण म्हणतं व्यसन सुटत नाही मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडले आहे

बुडणा-याला काढताना मध्येच सोडून द्यावं, जगण्या आणि मरणातील अंतर कळण्यासाठी

आपल्याला सतत पाहतो आहे हे त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही

माकडांपासुन माणुस बनला असेल तर...... अजून माकडं शिल्लक कशी?

पुण्यात सिग्नलची व्याख्या: करमणुकीसाठी रस्त्यात लावलेले उघडझाप करणारे तिन रंगीत दिवे

लाईन मारताना जपुन! तारा जुळल्या तर ठीक नाहितर कोळसाच

नुसती वाट पाहुन हाती येते ते म्हातारापन

शनिवार वाड्याजवळच्या टपरीमध्ये खालील पाट्या होत्या
* इडलीला चमचा मिळणार नाही* चटणी फक्त दोनदाच मिळेल
* साबुदाणा वडा पार्सल घेतल्यास प्लॅस्टिकची पिशवी मिळ्णार नाही (???)
* पोहे एक प्लेट (२०० ग्रॅम) (प्लेट च्या आकारावरुन वाद नको)

तुम्ही घरी येता आणि एक स्त्री तुमचं प्रेमानं स्वागत करते, तुम्हाला छान छान पक्वान्नं खाऊ घालते, दिवसभरातल्या तुमच्या दगदगीचा शीण आपल्या सोबतीनं हळुवारपणे घालवते... याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे?...

विचार करा...

सापडलं उत्तर?
*
*
*
अहो, तुम्ही चुकीच्या घरात शिरला आहात!!!!!

लग्नंतर बायका (आपापल्या) नवऱ्यांना कशा हाका मारतात, त्यांत कसा बदल होत जातो, पाहा!

पहिले वर्ष : अहो!

दुसरे वर्ष : अहो, ऐकलंत का?

तिसरे वर्ष : अहो, बंटीचे बाबा!

चौथे वर्ष : अहो, बहिरे झालात काय?

पाचवे वर्ष : कान फुटलेत की काय तुमचे?

सहावे वर्ष : इकडे येताय की मी येऊ तिकडे?

सातवे वर्ष : कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!

Followers