Friday, February 15, 2008

वाहने चालवा पण जपून

वाहन चलाव्ताना दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या दुर्घटनांच्या ध्वनिचित्रफिती

जितेंद्र अष्टेकर - सकाळ वृत्तसेवा पुणे, ता. १४ - वर्षातील ३६५ दिवसांमध्ये ३०९ अपघात, त्यापैकी ११७ प्राणांतिक अपघात आणि ९२ अपघातांमध्ये जनावरांचे बळी...गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यात झालेल्या विजेच्या अपघातांची ही "धक्का'दायक आकडेवारी आहे. मात्र, या अपघातांना जबाबदार कोण, किती प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली, याचा थांगपत्ता लागलेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये या अपघातांचा तपास करून फक्त अहवाल तयार करण्याखेरीज काहीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वाहन चालवताना दुर्लक्ष करू नका


सीट बेल्ट का वापरावा...


त्यामुळे वीज अपघातांमध्ये निष्पापांच्या बळींचे सत्र सुरू असून, "दोष कुणाचा,' हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. काही दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावर, विजेच्या तारांना चिकटल्याने एका युवकास प्राण गमवावे लागले. त्यापूर्वी कर्वेनगरमध्ये असाच जीवघेणा अपघात झाला होता. अशा अपघातांची पोलिस दप्तरी नोंद होते; तसेच ग्राहक किंवा वीज कंपनीकडून विद्युत निरीक्षकांच्या कार्यालयास माहिती कळविली जाते. न्यायिक अधिकार असलेल्या विद्युत निरीक्षकांकडून चौकशी करून अहवालही तयार करण्यात येतो. येथवर सर्व सोपस्कार नियमाप्रमाणे पार पडतात. पण या अहवालांचे पुढे काय होते, किती प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होतात आणि किती प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा होते, हा मुद्दा गुलदस्तातच आहे. याउलट एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या चौकशीनंतर संबंधितांवर विद्युत निरीक्षकाने गुन्हा दाखल करायचा, असे नियमांमध्ये स्पष्ट असूनही त्याच्या अंमलबजावणीत संदिग्धता ठेवून गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे तपासणीचे बहुतेक अहवाल फायलींमध्येच धूळ खात पडून राहतात. प्रामुख्याने दुय्यम दर्जाच्या किंवा बनावट उत्पादनांचा वापर, विद्युत संचाची रचना, मांडणीकडे दुर्लक्ष आणि देखभाल-दुरुस्तीचा अभाव ही वीज अपघातांची कारणे असल्याचे बहुसंख्य प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. त्यासाठी नव्या इमारतींमधील वीजपुरवठ्याच्या साधनांची तपासणी करून परवानगी देणे, त्याबरोबरच ट्रान्सफॉर्मर, जनित्रे, वीज वाहिन्यांचीही सुरक्षेची तपासणी करण्याचे काम विद्युत निरीक्षक कार्यालयाकडेच आहे. ही परवानगी मिळाल्यावरच त्या इमारतींचा वीजपुरवठा सुरू करण्यात येतो. तरीही त्यामध्ये अनेकदा दुय्यम दर्जाच्या उत्पादनांचा वापर होत असून, ते अशा अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे आढळले आहे. मात्र, त्याबाबतही दोषींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे "रोगाचे फक्त निदान होते, उपचार मात्र दूरच राहतात.' यातून वारंवार अपघात होण्याचे प्रकार घडल्याने या अपघातांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

No comments:

Followers