काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे
आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो, मझ्या मनात एक मुलगी भरली आहे
आधी सिगारेट ''दैनिक सकाळ'' होती
आणि अंघोळ ''विकली ईलस्ट्रेटेड'' होतीदाढी
दाढ़ी पण फक्त आमवस्येलाच गायब होत होती
लाइफ कशी एकदम कूल मध्ये चालली होती
सिगारेट माझी आता सुटली आहे
अंघोळ रोज दोनदा घडू लागली आहे
पामोलीव शेवचा मुहुर्त अमावस्येएवजी सूर्यास्त झाला आहे
लाइफ मध्ये कसा एकदम एंथू आला आहें
साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे
दिसली पोरगी, मार शिट्टि भेटला चम्या,
उडव खिल्ली वेळ मिळाला तर कर भंकसगिरी
एकूण काय तर, आदर्श अशी जीवन पद्धती होती
पोरगी दिसल्यावर आता शिट्टी वाजत नाही
चम्या लोकांची खिल्ली, हल्ली आपण उडवत नाही
भंकसगिरी तर पुर्ण विसरलो एकूण काय तर,
आपण आता जेंटलमन झालो आहें
साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे
पिक्चर पहायचा? ''नील'' कमल पाहू
भुक लागली आहे? वडा पाव मारु
शर्ट कोणता घालायचा? लाल भडक एकदम फंडू
हेयर स्टाईल कशी करायची? छोड यार टक्कलच करु
आता मात्र रोज ''RHTDM'' ची पारायणे
1 comment:
sundar kavita...
Post a Comment