कोण म्हणतं व्यसन सुटत नाही मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडले आहे
बुडणा-याला काढताना मध्येच सोडून द्यावं, जगण्या आणि मरणातील अंतर कळण्यासाठी
आपल्याला सतत पाहतो आहे हे त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही
माकडांपासुन माणुस बनला असेल तर...... अजून माकडं शिल्लक कशी?
पुण्यात सिग्नलची व्याख्या: करमणुकीसाठी रस्त्यात लावलेले उघडझाप करणारे तिन रंगीत दिवे
लाईन मारताना जपुन! तारा जुळल्या तर ठीक नाहितर कोळसाच
नुसती वाट पाहुन हाती येते ते म्हातारापन
शनिवार वाड्याजवळच्या टपरीमध्ये खालील पाट्या होत्या
* इडलीला चमचा मिळणार नाही* चटणी फक्त दोनदाच मिळेल
* साबुदाणा वडा पार्सल घेतल्यास प्लॅस्टिकची पिशवी मिळ्णार नाही (???)
* पोहे एक प्लेट (२०० ग्रॅम) (प्लेट च्या आकारावरुन वाद नको)
तुम्ही घरी येता आणि एक स्त्री तुमचं प्रेमानं स्वागत करते, तुम्हाला छान छान पक्वान्नं खाऊ घालते, दिवसभरातल्या तुमच्या दगदगीचा शीण आपल्या सोबतीनं हळुवारपणे घालवते... याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे?...
विचार करा...
सापडलं उत्तर?
*
*
*
अहो, तुम्ही चुकीच्या घरात शिरला आहात!!!!!
लग्नंतर बायका (आपापल्या) नवऱ्यांना कशा हाका मारतात, त्यांत कसा बदल होत जातो, पाहा!
पहिले वर्ष : अहो!
दुसरे वर्ष : अहो, ऐकलंत का?
तिसरे वर्ष : अहो, बंटीचे बाबा!
चौथे वर्ष : अहो, बहिरे झालात काय?
पाचवे वर्ष : कान फुटलेत की काय तुमचे?
सहावे वर्ष : इकडे येताय की मी येऊ तिकडे?
सातवे वर्ष : कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!
No comments:
Post a Comment