नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवातनवी
मुंबई , ता. ६ - नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमातळाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सिडकोने अमेरिकेतील लुईस बर्जर या कंपनीकडे सोपविली आहे. .....आराखडा तयार करण्यासाठी कंपनीला १० महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर लगेचच विमानतळ विकसकांची निवड केली जाईल, अशी माहिती सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक सी. एस. गिल यांनी दिली. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच या आंतरराष्ट्रीय विमातळाच्या कामाला सुरुवात होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनींपैकी ६५ टक्के जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. बाकीच्या २५ टक्के जमिनीसाठी या परिसरातील भूधारकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. शिवाय, जमिनी संपादन केल्यानंतर या भूधारकांना दिले जाणारे पुनर्वसन पॅकेज हे देशातील सर्वोत्तम पॅकेज असल्याचा दावाही गिल यांनी केला आहे. २०१२ पर्यंत विमानतळाच्या पहिल्या फेजचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. या विमानतळाच्या परिसरात पुरसदृश परिस्थिती उद्भवू नये म्हणून येथील गाढी आणि तळोजा या नद्यांमधील गाळ काढून त्यांच्या प्रवाहाची दिशाही बदलणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
No comments:
Post a Comment