Saturday, February 16, 2008

• मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन.....
टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून.

दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून.....
विचारणारे तिला आता योग्य संधी बघून.

शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून.....
कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?

नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून.....
काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?

तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून.....
पहायचय रे मला एकदा प्रेम करून !

-चैत.

No comments:

Followers