Thursday, March 15, 2012

कोंबडी कोणी पळवली… नेत्यांच्या स्टाईलने…

महात्मा गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला
आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून
दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

लोकमान्य टिळक – कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?

बाळासाहेब ठाकरे – जर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे
आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.

राष्ट्रपती ताई – कोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचा ‘
तीव्र’ शब्दात निषेध नोंदवते.

मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे
आवाहन करतो.

पी. चितंबरम - यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.

दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.

अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी
पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.

रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी
कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?

अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी
सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा
छडा....... लावावा.

अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर
जायेगी||

राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला
लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत.
इतरांनी नाक खुपसू नये.

आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा
हातात घेऊ नये.

राहुल गांधी – कोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|

बराक ओबामा – ओह नो! आय कांन्ट..

नारायण राणे – हिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.

मायावती – कोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.

नितीन गडकरी – कोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

No comments:

Followers