Tuesday, December 20, 2011

स्वप्नांचे दिवस...


स्वप्नांचे दिवस...
हिरमुसलेल्या स्वप्नांच्या ओंजळीकड़े पहिलं
की मला आठवतं,
मलाही स्वप्न पहायचा वेड होतं
कोणे एके काळी माझ्याही स्वप्नांचं
बहरलेलं झाड़ होतं
प्राजक्ताचा सडा पहिला की सगळी स्वप्नं
पुन्हा नव्याने आठवतात
त्यांचा मातकट सुगंध सगळीकड़े दरवळतो
कोमेजलेल्या स्वप्नांचा निर्जन सडा पाहून
तो प्राजक्त सुद्धा हळहळतो
दाणे टिपणारी चिमणी पहिली की ते
वेडसर दिवस आठवतात
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं वेचण्याची ती वेडी धडपड
डोळ्यांत जाणारी ती अदृश्य धूळमाती
त्याने डोळ्यांची होणारी फडफड
आणि हृदयाची होणारी कायम धडधड
अनाहूत आणि जीवघेणी
अगदी अस्ताला जाणाऱ्या सुर्यासारखी
पण पुन्हा ऊगवण्याच्या जिद्दीने भारावलेली
आशादायी सोनेरी किरनांच्या सुर्योदयासारखी
पण ती स्वप्नं होती वेडया, भोळसट मनाची
बावरलेली आणि अविचारी
पण तरीही सन्यस्त मूनिप्रमाणे तेजस्वी
न साकारता आलेली,
धुडकावून लावलेली,
कधी कधी दुर्लक्ष झालेली...
पण तरीही अजूनही...सन्यस्त आणि तेजस्वी!!!

...शामली

No comments:

Followers