Tuesday, December 20, 2011

नववर्ष येता येता मद्यरात्र झाली...

नववर्ष येता येता मद्यरात्र झाली...


नववर्ष येता येता मद्यरात्र झाली... ! 
अरे, पुन्हा दारूचे हे रिचवा पेग खाली !

आम्ही चार पेगांचीच आस का धरावी ?
जे नेहमीचच होते त्यांची वाट का पहावी ?
कसा चंद्र निळाईच्या वाहतो पखाली !

तेच साव करिती फिरुनी ह्या नव्या प्रकारी; 
तोच कैफ चढ्तो आम्हा, पाप हे विषारी ?
आम्ही ढोशीत असतो आमुच्या घश्याखाली !

बाटलीत केले त्यांनी बंद स्वर्ग साती, 
आम्हावरी् सोड्यासवे उडे फेसाळ ती !
आम्ही ती पेताडे ज्यांना गटार ना वाली !

अशा कशा ज्याने त्याने फोडल्या सिलबंदी ?
मायबाप सरकारनेही पहाटपर्यंत दिली संधी
ह्या अपार सुखाचीही चालली टिका-टवाळी !

उभा देश झाला आज एक मधुशाला
जिथे नववर्षाचा तान्हा दारूत न्हाला !
कसे पेताड सुदैवी अन्‌ बार भाग्यशाली !

फसफसतात अजुनी पाजल्या ब्रॅंड्चे फुगारे !
अजुन पेग मागत उठती उपट्सुंभ सारे !
संधीच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य सुरेश भट यांची माफी मागून)

No comments:

Followers