Tuesday, December 2, 2008

सैनिक हो तुमच्या साठी

२६ नोवेम्बर २००८ हा भारताच्या इतिहासातला काळा दिवस म्हणुन नोंदवला गेला आहे या दिवशी अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सर्व वीराना स्कॉट्सडेलच्या कट्ट्यातर्फ़े मानाचा मुजरा

गीतकार : ग. दि. माडगुळकर

गायिका : आशा भोसले

संगीतकार : दत्ता डावजेकर


भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्या साठी, सैनिक हो तुमच्या साठी
वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परी आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी
सैनिक हो तुमच्या साठी ...
आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडून या इकडे, वार्तासह येतो वारा
ऐकताच का अश्रूंची, डोळयात होतसे दाटी
सैनिक हो तुमच्या साठी ...
उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्री
माऊली नीज फिरिवते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येऊनी चिंता काळजा दुखविते देठी
सैनिक हो तुमच्या साठी ...
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यासह अमुची लक्ष्मी, तुमच्यासह शेतीभाती
एकट्या शिपाया साठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्या साठी ...

1 comment:

Sanjay Ahire said...

The resolution of every Indian would be tested and we hope this time around Indians do not forget this incident in the name of solidarity,patience and all the tamasha of various commitees for investigations. Hope this time Indian leaders stand tall and smoke those terrorists out of their Madarsaas.
--Jai Hind--

Followers