Friday, March 14, 2008

म्यानातुनि उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात !

प्रतापराव गुजर (कुड्तोजी गुजर) हे शिवाजी महाराजंचे सर्नौबत सेनापती होते , "प्रतापराव" ही पदवी शिवाजी महाराजानी त्याना मिर्जा राजे जयसिंह यांच्या विरुद्ध केलेल्या युद्धातिल परक्रमा मुळे दिली होती शिवाजी महाराजांच्या ख़ास मर्जी मधील एक म्हणजे प्रतापराव गुजर त्यानी साल्हेर च्या लढ्या मधे मुघलाना धुळ चारली होती
प्रतापरावांचा स्वभाव अतिशय चंचल होता महाराजांच्या राज्याभिशेका आधी १६७४ मध्ये त्याना आदिलशाही सरदार बहलोल खान याच्या विरुद्ध लढायला पाठवले मराठी सैन्याने बहलोल खानाच्या छावणीला वेढा घातला आणि खानाला शरण यायला भाग पाडले आणि त्याचे सर्व सैन्य अणि खानाला जेरबंद केले शिवाजी महाराजानी दिलेल्या आदेशाला विसरून प्रतापरावांनी खानाला मुक्त केले आणि त्याची सर्व संपत्ती कब्जात घेतली त्यावेळी खानाने शपथ घेतली की परत शिवाजी महाराजांच्या सैन्यावर हल्ला करणार नाही परंतु खानाचेच वचन ते थोड्याच दिवसनी त्याने परत हल्ल्याची तयारी चालू केली जेंव्हा महाराजाना ही ख़बर पोचली तेंव्हा महाराजनी रागाच्या भरात प्रतापरावाना संदेश धाडला " खानाला परत जेरबंद करून आणे पर्यंत प्रतपरावानी आम्हाला तोंड दाखवू नये " प्रतापरावाना याचे अतिशय दुखः झाले
त्याना मिळालेल्या सुचने प्रमाणे खानाचा डेरा जवळच आहें हे समजताच त्यानी आवेशाच्या भरात आपल्या सहा सैनिकांबरोबर खानावर हल्ला चढवला त्यानी खानाचे अनेक सैनिक कापून काढले परंतु खानाच्या आफाट सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि सातही शूरवीर कामी आले कुसुमाग्रजांच्या " वेडात मराठे वीर दौडले सात " या कवितेत याच गोष्टीचे वर्णन आहें आणि लता दिदिंच्या गोड गळयाची साथ तसेच हृदयनाथंच्या संगीताने ते अजरामर झाले आहें



म्यानातुनि उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

हे गाणे ऐकण्यासाठी : http://music.cooltoad.com/music/song.php?id=294413

No comments:

Followers