Monday, March 17, 2008

बाई माझी करंगळी मोडली ....

काल स्कॉट्सडेल कट्टा परिवारातील एका महाभागाची पायाची करंगळी मोडली तेव्हा मला हे गाणे आठवले
या कवितेचे कवी ग. दि. माडगूळकर यांची क्षमा मागुन खालचे विडंबन लिहित आहे
मूळ गाणे :
ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी कुणी काढली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा
गुपचुप येऊनी पाठीमागुनी, माझी वेणी ओढली

समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले, इरेस पडले, वनमाला तोडली

झटपटीत त्या कुठल्या वेळी
करंगळी हो निळसर काळी
का हृषिकेशी मम देहाशी निजकांती जोडली

विडंबन:
ऐन संध्याकाळी , अमितच्या घरी,
सोफ्याला लाथ मी मारली, अन बाई माझी करंगळी मोडली

खाली वाकून मी बसलो असताना,
अचानक अमित कुठून आला
हळूच मला दार उघड म्हणाला ,

समोर ठाके उभा सोफा,
मी ही चिडलो इरेस पडलो पटकन उठलो,
झटपटीत त्या डाव्या पायाची करंगळी हो मोड़ली

डॉक्टर कड़े जाता, तिने जोरत करंगळी ओढली
अन माझी करंगळी सरळ जाहली

1 comment:

P K Phadnis said...

वा छान! विडंबन चांगले जमले आहे.

Followers