दिनांक २१ मार्च २००८ : सकाळी सहा वाजता संजय आणि भास्कर च्या टपरीतला गरमा गरम चहा आणि बाबलांचे समोसे खाऊन आमच्या सहलीला सुरुवात झाली फोर्ड च्या दोन पंधरा आसनी गाड्या घेउन आम्ही २० जण कलाहरी ला निघालो
सर्व प्रथम आम्हाला तिकीटे मिळाली आमच्या गाडीचे आणि ट्रिप चे संचालक मोटे-बिजवे कंपनी ने दोन्ही गाड्या सजवुन ठेवल्या होत्या दरवाज्यातुन आत शिरताच कंपनी चे स्वागताचे चित्र लावले होते आणि कंपनी चे संचालक श्री संजय अहिरे, चालक आणि वाहक जोडीचे एक सुंदर चित्र (कंपनी लोगो ) लावले होते
स्वागत चित्र : मोटे-बिजवे कंपनी
(कंपनी लोगो )
गाड़ी मधे काही सूचना पण होत्या
दुपारी १२ वाजता सगळी मंडळी ह्युरॉन इथे असलेल्या घरी पोचली, पोचल्या क्षणापासुन पेय आणि अपेय पान चालू झाले , दुपारच्या जेवणाची सोय एका भारतीय होटेल मधून केली होती जेवण येई पर्यंत नाच गाणी चालू होती सर्वाना प्रचंड भूक लागल्यामुळे अन्नावर सगळे तुटून पडलो थोडी झोप झाल्यावर चहापानाचा कार्यक्रम झाला जेवाणानंतर मैफिल परत जमली नवीन लग्न झालेल्या जोडप्याना खुप सारा त्रास देऊन झाला मग गाण्यांची मैफिल सुरु झाली हळू हळू सगळे रंगत चालले होते रात्री ३ वाजता सगळे झोपी गेले
सकाळी १० वाजता कलाहारी वॉटर पार्क ला सगळे पोचलो दिवस भर पार्क मधे मजा करून संध्याकाळी परत घराकडे निघालो
या सहलीचे सुंदर आयोजन केल्याबद्दल स्कॉट्सडेल कट्टा परिवाराकडून सर्व आयोजकंचे मनःपुर्वक धन्यवाद
1 comment:
Hyaa trip che ayojan ani sanyojjan changale zaley. Tyaa baddal Harish ani Kailash che Abhaar.Ataa vaat pahaat aahot aahot amchyaa navin vahinichyaa pooran polyanchyaa....Kadhi amantran yete devach jaano.
Post a Comment