Saturday, March 15, 2008

घोळ झालाय डोक्यात च्यायला खुप घोळ झालाय

संदीप व किरण तुमच्या साठी खास
घोळ झालाय डोक्यात च्यायला खुप घोळ झालाय
ऑफिस मध्ये काय करतो मला माहित नसते
घरामध्ये बोलायला कोणीच नसते
कुठल्या दिवशी कोणाचा वाढ दिवस असतो वगैरे सोडाच
च्यायला पण कुठल्या दिवशी माझा वाढदिवस असतो ते पण मला माहित नसते

घोळ झालाय डोक्यात च्यायला खुप घोळ झालाय
मित्रना फ़ोन करायला मी विसरातो
ऑफिस मधे मीटिंग ला जायचे मी विसरतो
मीटिंग रूम ची नावे पण भारी " नर्मदा "
सिंधु असते कुठली तर कुठली असते गोदावरी
कुठली फर्स्ट फ्लोअर वर आणि कुठली सेकंड वर
हे पण मी विसरतो

घोळ झालाय डोक्यात च्यायला खुप घोळ झालाय
एकदा ना दोनदा हजारदा विचार येतात
बायको कधी येणार बायको कधी येणार
दिवसचे २४ तास त्यामुळे कमी पडतात काय काय करू

घोळ झालाय डोक्यात च्यायला खुप घोळ झालाय
कधी कधी वाटते मेडिटेशन करावे
डोक्याला थोड़े शांत करून ताळयावर आणावे
निसर्गाने इतके डोके दिले ते शांत असावे
प्रत्येक गोष्टीचे गणित डोक्यात फिट्ट बसावे
पण मेडिटेशन चा हा विचार लक्षात रहात नाही
कारण
डोक्यात घोळ झालाय इतका घोळ झालाय की अजुन आठवत नाही

काय काय घोळ झालाय , घोळ झालाय , डोक्यात , लाइफ मधे
अत्ता कळाले काय घोळ झालाय वाइफ नाही लाइफ मधे हाच मोठा घोळ झालाय

1 comment:

HAREKRISHNAJI said...

नशीब लांगल म्हणायच तुमच वाइफ नाही लाइफ मधे म्हणुन. असती तर घोळात घॊळ झाला असता

Followers