Monday, February 27, 2012

भारतीय संघाला ऑलिंपिकचे तिकीट


ऑलिंपिक हॉकी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सचा 8-1 असा धुव्वा उडवून भारतीय हॉकी संघाने लंडन ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश केला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडिअमवर रविवारी झालेल्या सामन्यामध्ये अव्वल ड्रॅग फ्लिकर संदीप सिंगने तब्बल पाच गोल केले. आजच्या पाच गोलांसह संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीप सिंगने 16 गोल केले. सरदार सिंगला "स्पर्धेचा मानकरी' घोषित करण्यात आले.

या सामन्याला प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा लाभला होता. सामन्याच्या सुरवातीपासूनच प्रेक्षकांनी "इंडिया इंडिया'च्या घोषणा देत भारताला जोरदार पाठिंबा दिला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या संदीप सिंगने पाच गोल करत भारताला जवळपास एकहातीच लंडनवारीचे तिकीट मिळवून दिले. पेनल्टी कॉर्नरवर राखलेली हुकूमत आणि भक्कम बचावामुळे भारतीयांनी फ्रान्सला अजिबात संधीच दिली नाही. रविवारी भारताला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील सहा सत्कारणी लावले. यातही, एकट्या संदीप सिंगनेच पाच गोल केले. वीरेंद्र लाक्राने 17व्या मिनिटास गोल करत भारताचे खाते उघडले. सिमॉन मार्टिनने 23व्या मिनिटास फ्रान्सचा एकमेव गोल केला.

No comments:

Followers