Tuesday, January 10, 2012

पाण्याचा ग्लास 'मन करा रे प्रसन्न'



प्रवचनकार बुवांनी आपले प्रवचन संपवलं आणि श्रोत्यांना विचारले

"तुमची कुणाची काही शंका किंवा प्रश्न असले तर मला जरूर विचारा."


हे ऐकताच कपाळावर आठ्यांचा जाळंअसलेला, त्रासिक चेहऱ्याचा एक मध्यमवयीन इसम उठला आणि 

म्हणाला, "तुमच्या प्रवचनात तुम्ही तुकोबाचं 'मन करा रे प्रसन्न' छान सांगितलत. पण आयुष्यातल्या 

चिंतांच, तणावांचा आम्ही काय करायचं?"

यावर बुवा थोडे अंतर्मुख झाले आणि म्हणाले, "थांबा सांगतो", आणि मग आपल्या एका शिष्याला म्हणाले

 "जा रे, एक ग्लास पाणी घेऊन ये माझ्यासाठी"

शिष्य ग्लासभर पाणी घेऊन आला.

बुवांनी श्रोत्यांना विचारले, "मंडळी, या ग्लासच वजन किती असेल?"

'पन्नास ग्रॅम', 'शंभर ग्रॅम','दीडशे ग्रॅम' ... श्रोत्यातूनआवाज आले.

यावार बुवा म्हणाले,

"खंर तर वजन मलाही नक्की माहित नाही. पण मला सांगा ग्लास मी दोन -तीन मिनिटं हातात धरून 

ठेवला तर काय होईल बर ?"

'काहीच नाही', एक श्रोता म्हणाला.

'बरं एक तास भार हातात धरून ठेवला तर काय होईल?'

'तुमचा हात दुखायला सुरवात होईल!'

'बरं, दिवसभर हा ग्लास मी हातात धरून ठेवला तर ?'

'तुमच्या हाताला मुंग्या येतील आणि हात लुळा सुद्धा पडेल. हॉस्पिटल मध्ये तुम्हाला अडमिटहि करावं 

लागेल.'

'छान हे सगळं करतांना ग्लासच वजन वाढेल का हो ?'

'छे ! मुळीच नाही'

यावर बुवा प्रसन्न हसले आणि म्हणाले, 'आयुष्यातल्या विवेंचनांच, तणावांच असाच आहे. त्यांच्याबद्दल 

थोडा वेळ विचार केला तर काही बिघडत नाही. थोडा जास्त वेळ त्यांचा विचार केलातर डोकं दुखायला 

लागेल आणि खूपजास्त वेळ विचार केला तर लुळे पांगळेच व्हाल. म्हणून तुमच्या चिंतांचा ग्लास अधून 

मधून खाली ठेवत जा आणि निर्धास्त होत जा.

भगवंत बघतोय ना सगळं !

मग म्हणा,

विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल..!!

3 comments:

favshireen said...

Good example.. not only to read but to follow..

favshireen said...

Good example...not just to read but to follow..

Kaivalya said...

अप्रतिम!

Followers