Sunday, December 4, 2011

हिंसा का अहिंसा

गांधी : भारत वासीयांनो शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा

सावरकर : शत्रुवर प्रेम कींवा विश्वास टाकला जात नाही.

गांधी :- अहिंसेचा मार्ग स्विकारा, कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.

सावरकर :- स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही.

गांधी :- मी एक हींदु आहे, आणि हिंदुंचे सगळे देव शांतीचा संदेश देतात.

सावरकर :- तुम्ही पोकळ हिंदु आहात, प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे, तर श्रीक्रुष्णाच्या हातात सुदर्शन चक्र .सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात.

गांधी :- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट, शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा.

सावरकर :- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. सीमा ह्या तलवारीने आखता येतात तत्वांनी नाही.

गांधी :- तलवारी नकॊत,ह्रुदय परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन जिंका.

सावरकर :- ज्याने आपल्याला मारुन टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदुंनो, अफजल खानाचे ह्र्दय परिवर्तन करता येत नाही त्याचे ह्रदय फाडावे लागते.

आता या पैकी आपल्याला कोणता विचार पटतो तो आपण स्वीकारावा....


1 comment:

Prash said...

फक्त सावरकर..........!

एक आग जी कधीच विझली नाही.....!

Followers