Wednesday, September 24, 2008

मराठी कविता

बालपण
सुदंर, निरागस आणि कोमल असते ते बालपण
दु:ख चिंतेविनाचा असतो तो एक काळ पण

सुर्याच्या विजेरीतला सेल नसतो संपत
आईस्किमचा डोंगर नसतो विरघळत
पावसाळ्यात ढगाआडची म्हातारी दळण असते दळत
आणि आम्हा मुलांचे फोटो असते काढत
वाटलीच भिती कधी तिचीतर आईचा पदर असतो जवळ पण
दु:ख चिंतेविनाचा असतो तो एक काळ पण

शाळा असते खाऊचि, डब्यात हजेरी असते तुपगुळाच्या लाडुची
मैत्री असते चिऊची, अन मन असते झाडावर अडकलेल्या पतंगिशी
आजी रात्री गोष्ट सांगत असते जादुगाराची
अन परीराणीच्या नगरीत राक्षशासी लढणाऱ्या राजपुत्राची
आलाच कधी राक्षस तर असते आजीच शेजारी पण
दु:ख चिंतेविनाचा असतो तो एक काळ पण

दररोज सुट्टीत चिंचाबोर खाव, शाळा सुटताच बेभान धावत सुटाव
व्याकुळतेन आईची वाट पहावी, अन आली कि हाथ सोडुन पळाव
पावसात मनसोक्त भिजाव, अन मग डोक आईन पुसाव
झोपताना देवाचि प्रार्थना करावी, अन मनोमन सुट्टीची स्वप्न पहाव
आलच रडु डोळ्यात शाळेत जाताना जर, तर असतात रडणारे मित्र सोबतीला पण
दु:ख चिंतेविनाचा असतो तो एक काळ पण

असते आपलीच आई सुदंर अन सर्वात प्रेमळ
ढिट अन ताकदवान असतात आपलेच बाबा केवळ
मायाळु अन अभ्यासात मदत करणारी ताई असते जवळ
मित्रांबरोबर चालवताना सायकल वाटत असत आयुष्यातले मार्ग सरळ
शाबुत असते तोपर्यत माणसातले माणुसपण आणि देवाचे देवपण
दु:ख चिंतेविनाचा असतो तो एक काळ पण

बालपण ते तारुण्य

लहानपणी मी खूप मजा करायची,
मनात येईल तेव्हाच अभ्यासाला बसायची,
नव्हते त्यावेळी मला कसलेच टेंशन,
असे होते माझे मजेशीर बालपण

पंरतू आता मी खूप मोठी झाली,
शाळा सुटून कोलेजात जावू लागली,
विविध कोर्सेस शिकण्यासाठी क्लास लावले,
त्यासाठी बाबांना भरपूर पैसे मोजावे लागले,

कोलेजमध्ये असल्यावर अभ्यासाचे टेंशन येते,
घरी असल्यावर नोकरीची अपेक्षा असते,
बाहेर गेल्यावर घरची सारखी आठवण येते,
मला वाटते यापेक्षा माझे बालपणच बरे होते

नव्हते तेव्हा मला अभ्यासाचे कोणतेही टेंशन,
नव्हती आजसारखी तेव्हा स्पर्धातील चढाओढ,
लहान असल्यामुळे खूप लाड होत असे,
पाहीजे ते मागेल तेव्हा मिळत होते

आपण सर्वांच्या मागे राहू अशी सारखी भीती वाटते,
परंतू पुढे जाण्यासाठी मला वाट न सापडे,
तुम्हीच मला सांगा मी का मोठी झाली?
माझे बालपणातील ते दिवस मला लाभतील का परत कधी?
- संतोषी साळस्कर.

Followers