Sunday, August 31, 2008

ते म्हणतात "Bloody Indians"

ते म्हणतात आम्हाला "Bloody Indians"
उपरेच शेवटी आम्ही त्यांच्या देशात,
शिष्टाचार त्यांचे उसने घेतले
पण भारतीय मनच जपले आम्ही त्यांच्या वेशात......
त्यांच्या संगीतात रमलो तरी
अजूनही कानात "लता"च घुमते आहे,
pizza burger च्या यांच्या संस्कृतीत
अजूनही आम्हाला पूरण पोळी जमते आहे.....
कधी हळूच मिटून डोळे
मन भारतात फिरून येते,
मुम्बईची सय आली की
डोळ्यानाही भरून येते.....
महत्त्व स्वातंत्र्याचं आम्हाला
तिथे असताना कधी कळलंच नाही,
Match जिंकल्यावर फटाके उडवण्याचे
स्वातंत्र्य आम्हाला इथे उरलच नाही.....
धोब्याचं कुत्रं होउन गेलोय
मिळाली जरी "NRI" ची उपाधी तिथे,
राबलो कितीही त्यांच्यासाठी जरी
ठरतो आम्ही "Bloody Indians"च इथे......
Orkut वर वाचली मनाला भावली म्हणुन सग्ल्याना शेयर करतो आहे
- स्वप्ना जोशी (एक परदेशस्थ भारतीय) यांची कविता आहे.

2 comments:

आशा जोगळेकर said...

छानच आहे कविता एन आर आय च्या मनातलं सांगणारी

Anonymous said...

ewhadhe waatat asel tar bharataat parat ja na!

Followers