Wednesday, August 20, 2008

हे काय चालू आहे ....

आजच्या सकाळ मधे एक बातमी होती "संगणक अभियंत्याची आत्महत्या" गेल्या १५ दिवसातील ही दूसरी बातमी या आधी ६ ऑगस्ट ला संदीप शेळके या तरुणाने पण तोच मार्ग अवलंबला हे काय चालू आहे ?
आजच्या "फास्ट लाइफ" प्रकार मुळे ह्या सगळ्या घटना होत आहेत असे कुठे तरी बोलले जात आहे पण खरच स्वतःचा जीव घेण्याइतके नैराश्य आज समाजात आले आहे का ? मान्य आहे सगळ्याना ताण आहे, स्पर्धा पण आहे, या मुळे जीव द्यावा इतका मुर्ख विचार डोक्यात येतो अणि आचरणात येतो या सारखे दुर्दैव नाही सहज वाचनात एक पुणे प्रतिबिंब मधील लेखआला खरोखरच याची गरज आहे का याचा आपण विचार केला पाहिजे
जरुर वाचा आणि विचार करा
संगणक अभियंत्याची आत्महत्या
संदीपच्या निमित्तानं...
पुण्यात आयटी कंपनीच्या इमारतीवरून उडी घेऊन अभियंत्याची आत्महत्या
ताणामुळे आत्महत्या - ई सकाळच्या वाचकांनी सुचवले उपाय...
सततचा ताण आणि बर्न आऊट!
आय। टी. बुलेटीन बोर्ड - सर सलामत तो पगडी पचास
'आयटी'तील ताणावर उतारा!
यातील विचार माझे नाहीत पण माला वाटते की सर्वानी या वर विचार नक्की करावा आणि काही तरी उपाय शोधावा निदान स्वतः पुरता तरी ......

1 comment:

RandhirSingh Rajput said...

Vahini Namaskar
First of all thanx for putting this editorial or lekh on scotsdale katta.
My comments is
whatever happens good or bad , think positive, be positive, and laugh a lot.

Followers