Wednesday, January 30, 2008

कधीतरी असेही जगून बघा…..

कधीतरी असेही जगून बघा…..कधीतरी असेही जगून बघा…..

माणूस म्हणून जगतानाहा एक हिशोब करुन तर बघा!

“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधीसमोरच्याचा विचार करुन तर बघा!

तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठीन आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतातकधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!

स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपणकधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असतेकधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!

काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!

कधी असेही जगून बघा…..प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!

No comments:

Followers