Wednesday, January 23, 2008

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते.त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्‍या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसानेपडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.दुसर्‍याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून त्या समस्येकडे बघू शकत नाही.तुम्ही तुमचाच तराजू वापरता.

2 comments:

Art Not So Desi said...

cAN YOU TRANSLATE THIS IN ENGLISH PLEASE
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही..

पण गगन भरच वेड राख्तातच असावा लागता

कारण गगन्भराचे वेद दत्तक घेता येत नाही
mail me neelambari_warty@yahoo.co.in

Art Not So Desi said...

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही..

पण गगन भरच वेड राख्तातच असावा लागता

कारण गगन्भराचे वेद दत्तक घेता येत नाही
please mai lme teh meaning in english
neel3105@gmail.com

Followers